Friday, April 16, 2021

मी क(ग) मविलेल्या गोष्टी....!
.
..
सहज मोबाईल च्या फ़ोटोज gallery मध्ये नजर गेली.... जुन्या कविता दिसल्या....
पुन्हा वाचायचा प्रयत्न केला....
"शब्दं तेच होते पण त्यांचे अर्थ मात्र बदलले होते.."
.
#आपला लिखाण आपल्यापुरत मर्यादीत नसतं...ते जस उतरत लगेच जगाशी जोडल जातं अन तेही आपसुकच.
'वाटायचं,,, कोणाशी तरी बोलावसं वाटण म्हणजे लिहिण'
तसच आहे ते. आयुष्यात अनेक प्रसंग येतात... मनात रुतून बसतात.. काही खुप कमी काळासाठी असतात तर काही अगदी आयुष्य जोवर आहे तोवर सोबत राहतात.
प्रत्येक मध्ये काही न काही गुण आहेच फक्त बाहेर यायला वेळ लागतो पण तो बाहेर येण्यासाठी एखादी घटना कारणीभूत असते... सुखद अथवा दुख:द.
.
जबाबदारी,आवड,विचार,मन, हे आणि असे अनेक शब्द वेगवेगळे असले तरी सरतेशेवटी कोणत्या न कोणत्या गोष्टी मध्ये अडकून रहताताच.
स्वत:ची स्वप्न, आयुष्याचा जोडीदार, घरची जबाबदारी, समजाच देण, अन अखेर देवाचे आभार... बस्स. ह्या पलीकडे देखील खुप काही आहे पण आपण तिथवर पोहचलो नाही अजुन.
हसतखेळत आयुष्य जगावं.... दुखा:ला ही अगदी तसच सामोर जावं.
प्रसंग येतात.. अन निघुन जातात.. आठ्वणी ठेऊन.
त्या जपता आल्या पाहिजे... हेच खरं गुपीत आहे. 🙏🖋
- समिर 🙌


 

Wednesday, March 18, 2020

"मी सारी जिंगदी माझी, तुला जपणार आहे" #SP❤️

मी क(ग) मविलेल्या गोष्टी…!!

जिंदगी बडी हसीन है, अकसर ये केहलाती हैं….

"मुझे कहना नही आता, अब तुम समझना सीख जाओ"

वर्षाच्या सुरुवातीला पुढचं नियोजन कसं???ह्यावर चर्चा सुरू होती।। माझ्या पुस्तकाच्या नावाप्रमाणे अनेक गोष्टी गमावल्या आणि कमवल्या, पण या सरत्या वर्षात एक व्यक्ती अनपेक्षित पणे माझ्या आयुष्यात आली आणि आयुष्यच बनून गेली❤️

आई-वडील, भाऊ बहीण, मित्रमंडळी, नातेवाईक आणि देवा-ब्राह्मणा च्या साक्षीने २-१२-२०१९ रोजी लग्नाच्या बेडीत अडकलो (स्वतःहून) 🙈✌️😍 दोन घटकांचं प्रेम आणि आयुष्यभराची साथ👫

जानेवारी-फेब मध्ये झालेली ओळखीची सुरुवात डिसेंबर अखेर एका गोड नात्यात बदलली💏

प्रेम म्हणजे नेमकं काय?? एकमेकांनी एकमेकांना सुखी करण्याची भावना -

शेवटी सर्व बोलत होतेच म्हणा - "दगडूशेठ च्या दर्शनाला जायचास म्हणून "पूजा" भेटली "❤️✌️😍 🙈(इश्श -इथे थोडं लाजाव लागत कारण शास्त्र असत ते😆)

असो, पण जे काही आयुष्यात घडतं, घडत असतं चांगलंच असतं🤞 विश्वास असावा☺️ ओढून-ताडून नातं टिकत नाही संयम महत्वाचा (अनुभवाचे बोल)

जाताना एवढं सांगेन, पूजा  तुझ्या प्रत्येक सुख-दुःखात मी असेल, लग्नानंतर माणूस बदलतो (अशी बोलण्याची रीत असते बहुदा) पण तू जशी आहेस तशीच राहाविस मला देखील समजून घेशील (आणि सांभाळून देखील🙈😆) बाकी मी आहेच समर्थ (त्यात तिळमात्र शंका नाही) नवीन वर्षाच्या आणि नवीन आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा🤗😘

"मी सारी जिंगदी माझी, तुला जपणार आहे" #SP❤️

-समीर शीतल सीताराम चिले

मी क(ग)विलेल्या गोष्टी….!

मी क(ग)विलेल्या गोष्टी….!
महाशिवरात्र असली की आठवण येते ती आजोबांची… आईचे बाबा, तसं मला दोन्ही आज्जी आजोबांचं प्रेम भेटलं🙏
पप्पांचे आई-बाबा म्हणजे ‘निगडीचे आज्जी-आजोबा’ आणि आईचे आई-बाबा म्हणजे ‘पुणेचे आज्जी-आजोबा’ असं लहानपणी बोलायचो…!🙊 लहानपण सरल, पण आज्जी आजोबांचं प्रेम अजून तसंच आहे.
फोटो मध्ये लहान मुलगा आहे तो स्वतः मी (उभारता वल्ली🙈) आणि शेजारी उभे आहेत ते पुणेचे आजोबा. त्यांचा आणि माझा असा सोबतचा फोटो नाही भेटला मला, पण लहानपणी मी रांगत असताना मला बघताना चा हा फोटो😍
१९९८ ला ते स्वर्गवासी झाले,महाशिवरात्री होती तेव्हा, तेव्हा शाळेत होतो मी, नक्की काय झालं हेच माहिती नव्हतं, सर्व रडतात आणि आजोबा कुठे दिसेना बस…..
निगडी वरून आलो की ‘रुपाली’ च्या गेट जवळ आजोबा वाट बघत उभे असायचे अन मला बघताच दोन्ही हाथ लांब करून मला जवळ या असा इशारा करायचे… आणि मी धावत त्यांच्याकडे जायचो आजही ‘रुपाली’ च्या गेट जवळ गेलो तर भास होतो… की आजोबा समोर दोन्ही हात लांब करून जवळ बोलवता आहेत😍😍
नशीबवान असतात जे ज्यांना आज्जी-आजोबांचं प्रेम भेटत… देवाची ती एक अनमोल देण आहे त्याला जपा. त्यांचा आदर करा🙏🙂
-समीर सिताराम चिले
(रुपाली-पु ल देशपांडे राहत असलेली सोसायटी😍)